पक्षी जे झाडावर गाणे गातो -पु.शि.रेगे

पक्षी जे झाडावर गाणे गातो
आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात
पक्षी जे झाडावर गातो

झाडावर जे गाणे पक्षी गातो
आहे पक्षी दुसरा गाण्यातच त्या पुन्हा
झाडावर जे पक्षी गातो.


-पु.शि.रेगे

2 comments:

  1. म्हटलं तर शब्दापुढे जोडलेला शब्द आणि विचार केल्यास एक खोल अर्थ!!जो ज्याचा त्याने घ्यायचा!!

    ReplyDelete
  2. धन्यवाद
    मला पक्ष्याचे एक व्यंगचित्र मिळाले त्यावर लिहिताना मला ही कविता आठवली आणि इथे मिळाली

    ReplyDelete

 
Designed by Lena